
मुडलगी : डालमिया सिमेंट कारखान्यात काम करत असताना तोल जाऊन पडल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना मुडलगी तालुक्यातील यादवाड गावात घडली आहे.
सिमेंट कारखान्यात कामावर असताना तोल जाऊन खाली पडल्याने रमेश राम नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला. नंदकुमार आणि रमेश महेंद्र राम हे दोन कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बागलकोट जिल्ह्यातील केरूरडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त कामगारांनी कारखान्याच्या सुरक्षा कार्यालयावर दगडफेक करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. मृत कामगार बिहारमधील असल्याची माहिती उपलब्ध झाली असून घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. कुलगोड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पाहणी केली आहे. या संदर्भात कुलगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta