

दिल्ली : एन.के. एज्युकेशन फाऊंडेशन, अंजनेय नगर, बेळगावचा विद्यार्थी अनीश कोरे याने दिल्ली येथे शिक्षण आणि क्रीडा संचालनालय, राष्ट्रीय राजधानी प्रदेश (NCT) दिल्ली यांच्या वतीने आयोजित ६९व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत (69th National School Games) ५० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत द्वितीय क्रमांक (2nd Rank) पटकावला आहे.
अनीशने आपल्या दमदार कामगिरीने स्पर्धेत चमकदार प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या यशाबद्दल एन.के. एज्युकेशन फाऊंडेशनचे संचालक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
अनीश कोरेचे हे यश बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta