Tuesday , June 2 2026
Breaking News

कंग्राळी खुर्द येथे क्रिकेट स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : कंग्राळी खुर्द मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटनाच्या सामन्यात अभिज मरगाई वडगाव संघाने जिजामाता स्पोर्ट्स, बस्तवाड संघाचा पराभव करून विजय मिळवला.

कार्यक्रमाची सुरुवात गावातील अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पूजनाने झाली. पूजन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कर्नाटक राज्य माजी प्रभारी प्रकाश मोरे, जिल्हा सचिव महांतेश कोळूचे, कायदेशीर सल्लागार ॲड. विजयकांत नाईक आणि ग्रा पंचायत उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर ता. प. अध्यक्षा अर्चना अलगोडी, नगरसेविका रेश्मा पाटील, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील आणि प्रा. पौर्णिमा पाटील यांनी श्री मरगाई व मातंगी देवीचे पूजन केले. व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज मुर्तीपूजन मार्कंडेय सहकारी साखर कारखाना अध्यक्ष आर. आय. पाटील, ॲड. एम. जी. पाटील, उद्योजक आणि टी-शर्ट स्पॉन्सर संजय मोहनगेकर व अडत व्यापारी जोतीबा कटांबळे यांनी केले.

श्री गणपती व सरस्वती पूजन कॉन्ट्रॅक्टर विजयकांत नाईक, श्रीकांत राठोड आणि बीके कंग्राळी ग्रा पं. सदस्य यल्लोजी पाटील यांच्या हस्ते झाले.
कै. ए. बी. आय. पाटील आणि शहीद जवान वामन जाधव यांच्या फोटो पूजनाचा कार्यक्रम अध्यक्ष यल्लप्पा पाटील, भाऊ पाटील आणि मान्यवरांनी पार पाडला.
दिपप्रज्वलन सर्व ग्राप सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर आयोजकांनी मान्यवरांचा नोटबुक, पेन आणि बुके देऊन सत्कार केला. तसेच पै. कामेश पाटील, पै. प्रेम जाधव, नव्या अग्नीवीर साहिल पाटील, अथर्व पाटील आणि नूतन ॲड. संदीप देसाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून गौरव करण्यात आला.

मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये आयोजकांच्या नेटक्या नियोजनाचे कौतुककरत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने चषक अनावरण, क्रिडांगण पूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी उमेश पाटील, आदित्य पाटील, किरण पाटील, एसडीएमसी अध्यक्षा मिनाक्षी मुतगेकर, आपाजी पाटील, वाय. आर. पाटील, मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी, क्रिकेट प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Spread the love  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *