

बेळगाव : महाराष्ट्र सरकारने 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला सुप्रीम कोर्टात दाखल केल्याने 2006 सालापासून कर्नाटक सरकार अधिवेशन घेऊन बेळगाववर हक्क सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला विरोध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला मोठ्या संख्येने हजर राहण्याचा निर्णय येळ्ळूर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी ए.पी.एम.सी. सदस्य वामनराव पाटील होते.
प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी महामेळाव्यासंदर्भात सविस्तर माहिती विशद केली.
या बैठकीत बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या विचारानुसार विभागवार बैठका घेऊन नूतन कार्यकारिणी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
यावेळी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुद्दापा बागेवाडी, युवानेते दत्ता उघाडे, उदय जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष भोला पाखरे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप देसाई, ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष नागेश बोबाटे, उदय जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य सतिश देसुरकर आदिनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी माजी ता. पंचायत सदस्य चांगदेव परीट, ग्रामपंचायत सदस्य राकेश परिट, ग्रामपंचायत सदस्या सौ. अनुसया परीट, ग्रामपंचायत सदस्या सौ. रुपा पुण्याण्णावर, ग्रामपंचायत सदस्या सौ. वनिता समीर परीट, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पाटील, कृष्णा शहापूरकर, सुरज गोरल, भिमराव पुण्याणावर, नाथाजी कदम, दौलत पाटील, रमेश धामणेकर, अनंत गा. पाटील, नंदकुमार पाटील, लक्ष्मण कुंडेकर, समीर परीट, बाळकृष्ण धामणेकर, भरमाण्णा कंग्राळकर, बी. एन मजुकर, प्रकाश मालुचे, रामा पाखरे, चांगापा मालुचे, सुरज पाटील, सुरेश भोवी, यल्लापा आ. पाटील, परशराम कुंडेकर, पवन कुगजी, गणेश अष्टेकर,गणेश नाईक. पाटील, आदित चतुर आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी रमेश पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta