
कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे गावातील प्राथमिक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले.
अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष राजू बुरुड उपस्थित होते.
प्रारंभी शाळेच्या प्रभारी मुख्याधिपिका वैशाली कणबरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले
गावातील प्राथमिक शाळेची समस्या लक्षात घेऊन शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गावातील महात्मा गांधी सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन एकवीस हजार रुपयाचे कमर्शियल आरो प्लॅन्ट वाटर फिल्टर देणगीतून स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. तासाला पंचेचाळीस लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.
फिल्टर मशिनचे पुष्पहार व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नूतन प्रभारी मुख्याधिपिका वैशाली कणबरकर यांचाही सन्मान करण्यात आला.
तसेच प्रतिभा कारंजी स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना संस्था अध्यक्ष वाय पी नाईक यांनी विद्यार्थी हा देशाचा महत्त्वाचा घटक आहे.ज्ञानमंदिरात विद्यार्थी घडत असतो.चांगले संस्कार हेच आयुष्य घडवत असतात. शाळातून सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक असते. स्वच्छ पाणी निरोगी शरीर ठेवते . निसर्ग रम्य मोकळी हवा शाळेच्या सौंदर्याचं वैभव असते. शिक्षक पालक विद्यार्थी हाच आदर्श निर्माण करणारे समाजातील मूलभूत घटक आहेत आरोग्य हिच खरी संपत्ती आहे असे मौलिक विचार व्यक्त केले
यावेळी वाय पी नाईक, सौ.वैशाली कणबरकर, हभप शिवाजी जाधव, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष राजू बुरुड, पी.एस.मोरे, युवराज नाईक, शिक्षक एस.आर.सवदी, सौ.एन एम हुक्केरी, सुरेखा मोरे, निर्मला नाईक, आशा बाचीकर, रेणुका मोरे, रामचंद्र बडसकर, यशवंतराव मोरे, मारुती मोरे, वनिता कणबरकर, सुधा मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत वैशाली कणबरकर यांनी केले आभार एस आर सवदी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta