
बेळगाव : सुवर्णसौधच्या भव्य पायऱ्यांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वज प्रस्तुत करून त्याचे अनावरण केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, “आपल्या देशात अनेक जाती आणि धर्म आहेत. आपण धर्मनिरपेक्ष राहायला हवे. एका माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करावे, द्वेष करू नये. हे समतावादी समाज आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करण्यासाठी पोषक आहे,” असे त्यांनी म्हटले.
विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनीही आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर फरीद, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष रुद्रप्पा लमाणी, विधान परिषदेचे सरकारचे मुख्य सचेतक सलीम अहमद, विधानसभेचे सरकारचे मुख्य सचेतक अशोक पट्टण, सरकारचे मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांच्यासह आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सदर ध्वज गुलबर्गा जिल्ह्यातील कमलापूर येथील विनोदकुमार रेवप्पा बम्मन्न यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वैयक्तिक प्रयत्नातून तयार केला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हा खादी राष्ट्रीय ध्वजाचे आज सुवर्ण विधानसौधच्या भव्य पायऱ्यांवर अनावरण करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta