


बेळगाव : अतिथी शिक्षिकांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कोप्पळ जिल्ह्यातील लता पाटील या महाविद्यालयीन पदवीधर अतिथी शिक्षिका प्राध्यापकांनी आंदोलनस्थळीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी पात्रतेअभावी त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले होते. त्या शिक्षिका काही दिवसांपासून आंदोलनात सहभागी होत्या व मानसिक तणावाखाली असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर आंदोलनस्थळी बराच गोंधळ निर्माण झाला होता.
सोमवारी आमदार एस. मागण्या व्ही. संकनूर आंदोलकांच्या ऐकण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाले होते. मात्र त्यांना पाहताच संबंधित शिक्षिका संतापल्या. “आम्हाला आमच्या व्यथा तुम्हाला सांगायच्या नाहीत, मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटायला पाठवा,” असे त्यांनी संकनूर यांना स्पष्ट सांगितले. यावर आमदारांनी, ‘तुमच्या सर्व मागण्या मला सांगा, मी त्या मुख्यमंत्र्यांना कळवतो,” असे उत्तर दिल्यानंतर आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला. या गोंधळातच शिक्षिकेने पेंडॉलमध्ये विष पिण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांनी आणि पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखले आणि सुरक्षित ठिकाणी हलवले. घटना होताच पोलीस बंदोबस्त वाढवला घटनेची माहिती मिळताच पोलीस बंदोबस्त तात्काळ वाढवण्यात आला. डीसीपी नारायण बरमनी स्वतः आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी आंदोलक अतिथी शिक्षिकांशी संवाद साधत त्यांची समजूत काढली. “तुमच्या मागण्या मी वरिष्ठांकडे कळवतो, आम्ही तुमच्यासाठी आहोत,” असे आश्वासन देत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर आंदोलक शिक्षक शांत झाले.
Belgaum Varta Belgaum Varta