
बेळगाव : दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी मराठी विभागातर्फे शाळेतील ग्रंथपाल हर्षदा सुंठणकर यांची इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रकट मुलाखत घेतली. विद्यार्थिनी श्रावणी रेडेकर हिने पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्या हर्षदा सुंठणकर यांचे स्वागत केले. ‘कपडे वाळत घालणारी बाई’ या त्यांच्या काव्यसंग्रहाला आतापर्यंत तेरा पुरस्कार मिळाले आहे. हे पुरस्कार महाराष्ट्र- कर्नाटक येथून मिळाले आहेत तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही त्यांच्या या काव्यसंग्रहाला मिळालेला आहे. असा एक उत्कृष्ट कवयित्री त्यांचा साहित्य प्रवास उलगडण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधला आणि त्यांना समजावून घेतलं. यासाठी समृद्धी येळवे व जिज्ञेश गुरव दोघांनी मुलाखत घेतली. कवितांचा प्रवास, शिक्षण, कोणत्या गोष्टी प्रेरणा देतात? असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तरे कवयित्री हर्षदा सुंठणकर यांनी दिली. तोत्तोचान, मृत्युंजय, छावा या पुस्तकांना शाळेमध्ये खूप मागणी आहे. कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या स्त्रिया या हर्षदा सुंठणकर यांच्याशी कवितेमुळे जोडल्या गेल्या. स्वतःच्या आत्मसमाधानासाठी त्या स्वतः कविता लिहितात असेही त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी शिक्षिका माया पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta