Monday , April 28 2025
Breaking News

जपल्या जाताहेत संभाजीराजांच्या स्मृती!

Spread the love

बेळगाव : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त श्री एकदंत युवक मंडळाच्या वार्ता फलकाजवळ बुधवारी रात्री धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी विधिवत पूजन केले.

छत्रपती संभाजी महाराजांनी आमिषाला बळी न पडता धर्मासाठी, स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान केले. हा आपला पराक्रम इतिहास आहे. परंतु आज काही हिंदू इतिहास विसरल्याने नोकरी, पैसे इत्यादींच्या लोभासाठी आपला धर्म सोडत आहेत. त्यामुळे आपल्या भागामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानावर जनजागृती करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी केले. ते शिवप्रेमी एकदंत युवक मंडळाच्यावतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास कार्यक्रमात बोलत होते.

कोणी महिनाभर पायात चप्पल घालणार नाही, कोणी या काळात आपला आवडता पदार्थ सेवन करणार नाही, तर कोण चित्रपट वा नाटक पाहायला जाणार नाही… एक प्रकारचा हा आत्मक्लेश होतोय तो केवळ छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जपण्यासाठी. समर्थ नगर बेळगाव येथील एकदंत युवक मंडळाच्या सदस्यांनी महिनाभरासाठी हे आगळेवेगळे व्रत अंगीकारले आहे. ‘धर्मवीर बलिदान मास’ या रूपाने होत असलेल्या या उपक्रमात 15 जणांनी या भागातील मुंडणही करवून घेतले आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्युपूर्वी औरंगजेबाने केलेला छळ आत्मक्लेशाच्या रूपाने सतत मनात राहावा व यातून स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची स्मृती जपली जावी यासाठी एकदंत युवक मंडळाच्या सदस्यांनी धर्मवीर बलिदान मास पाळला आहे, असे संतोष कणेरी यांनी सांगितले

यावेळी या परिसरातील शंभूराजे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

१५ हजाराच्या रक्कमेसाठी गणेशपूरमधील “त्या” महिलेचा खून : अल्पवयीन मुलासह माय-लेकींना अटक

Spread the love  बेळगाव : व्याजाने घेतलेली रक्कम परत देत नसल्याच्या कारणातून लक्ष्मी नगर गणेशपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *