Tuesday , December 16 2025
Breaking News

दोनच दिवसात अलंग, मदन कुलंगा किल्ला सर

Spread the love

 

बेनाडी ‘सह्याद्री ट्रेकर्स’च्या; आजपर्यंत ६८ किल्ल्यांची भ्रमंती

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील व लखन माळी यांच्यासह सदस्यांनी महाराष्ट्रातील नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर ४ हजार ८०० फुटावर असलेल्या अलंग, मदन, कुलंग (एएमके) हे तीन किल्ले केवळ दोन दिवसात सर करण्याचा उपक्रम राबविला. हे तीनही किल्ले सर करण्या अवघड असले तरी केवळ धाडसाच्या जोरावर त्यांनी हे पाऊल केवळ किल्ला सर करून न थांबता परिसरात पडलेल्या कचऱ्याची स्वच्छता त्यांनी केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे बेनाडी आणि निपाणी परिसरातून कौतुक होत आहे.
उरात धडकी धडकी भरणारे किल्ले सर करणे अवघड काम आहे. अशी परिस्थिती असताना बेनाडीतील लखन माळी, अशोक माळी, मयुर माळी, बाबासाहेब कमते, ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील, सागर हरेर, रमेश पठाडे आणि कागल येथील सत्यजित इंगवले या वयाच्या ३४ शी मधील युवकांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांनी दोन दिवसात अलंग, मदन, कुलंग (एएमके) सर करीत सर्वांना अचंबित केले आहे. त्याच्या रूपाने सह्याद्रीच्या कुशीत नव्या ट्रॅकर्सचा उदय झाल्याची भावना गिरीप्रेमींची झाली आहे.
‘सह्याद्री ट्रेकर्स’ ग्रुपने महाराष्ट्रातील सर्वात आवघड ट्रेक (एमके) अर्थात अलंग मदन कुलंग पुर्ण करण्यासह आवघड समजल्या जाणाऱ्या किंगानायक, हरिश्चंद्रगड, भैरवगड, सांधनदरी, कलावंतीनदुर्ग अशा गड-किल्ल्यांची ही सफर केली आहे.
१८ व्या शतकात अंलंग आणि मदन किल्ल्याच्या पायऱ्या इंग्रजानी सुरंग लावून उध्वस्त केल्याने प्रस्तरारोहण केल्या शिवाय वरती जाणे शक्य नसल्याचे लखन माळी यांनी सांगितले.
——————————————————————–
‘पायथ्याशी असणाऱ्या गावातून स्थानिक गाईड ज्याला प्रस्तरारोहण अवगत आहे, आसा गाईड सोबत घ्यावा लागला. गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून असे आनेक गड किल्ले घाट, वाटा सर करणे, त्यांची स्वच्छता करणे त्यांचा इतिहास समाजा समोर आणने या गोष्टी ग्रुपतर्फे केल्या जात आहेत. हजारो वर्षांपासून ताट मानेने उभे असणारे गड किल्ले प्लास्टिकमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. त्याबद्दल जनजागृती करणे, पर्यावरण आणि किल्ले संवर्धन असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ग्रुप कार्यरत आहे.
– शहाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य बेनाडी

About Belgaum Varta

Check Also

वंदे शासनम चॅलेंजर्स क्रिकेट संघ ‘जैन प्रीमियर लीग २०२५’ चा मानकरी

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील सॅटर्डे टर्फ क्रिकेट ग्रुप आयोजित जैन प्रिमियर लीग- …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *