Wednesday , March 4 2026
Breaking News

आंबेवाडी गावचे जवान मयूर धूपे यांचे कॉम्बॅट ट्रेनिंगदरम्यान अपघाती निधन

Spread the love

 

बेळगाव : आंबेवाडी गावचे रहिवासी असलेले भारतीय सेनेतील जवान मयूर लक्ष्मण धूपे यांचे कॉम्बॅट ट्रेनिंगदरम्यान झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले. देशसेवेच्या कर्तव्यावर असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

शहीद जवान मयूर लक्ष्मण धूपे यांचे पार्थिव उद्या सकाळी बेळगाव येथे आणण्यात येणार असून, मिलिटरी हॉस्पिटल बेळगाव येथून ते आंबेवाडी येथील त्यांच्या मूळ गावी नेण्यात येईल. आंबेवाडी येथे सर्व शासकीय सन्मानांसह, एक्स-सर्व्हिसमेन ऑर्गनायझेशन तसेच संबंधित संघटनांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अंत्यसंस्काराचा तपशील:
वेळ: सकाळी ९.३० वाजता
स्थळ: आंबेवाडी (मूळ गाव)

सदर माहिती श्री. शिवबसप्पा कडन्नावर जनरल सेक्रेटरी, बेळगाव जिल्हा महाकठ एक्स-सर्व्हिसमेन ऑर्गनायझेशन, बेळगाव यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *