
बेळगाव : कॅपिटल वन सोसायटीच्या सांस्कृतिक दालनातर्फे मानाच्या कॅपिटल वन करंडकासाठी होणारी १४ वी एकांकिका स्पर्धा दिनांक २०, २१ डिसेंबर २०२५ रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
स्पर्धेतील रंजकता व दर्जा कायम ठेवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आभासी पद्धतीने संघ निवडले जातात. अनेक संघानी आपला सहभाग नोंदविला होता. त्यातून केवळ दिग्गज संघांची निवड करून त्यामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
आपल्या परिसरातील नाट्यपरंपरेची जान ठेवून संस्थेनी उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन करण्यासाठी बेळगांव जिल्हा मर्यादित शालेय गटात देखील स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला असून यामुळे स्थानिक कलाकारांना देखील आपल्या कलेचा अविष्कार सादर करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
बेळगांवकर नाट्यरसिकांनी नेहमीप्रमाणे रंगकर्मींना भरपूर दाद देऊन स्पर्धा यशस्वी करावी असे अवाहन ही यावेळी करण्यात आले.
स्पर्धेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

दिनांक २० रोजी सकाळी ११ पासून ०२ पर्यंत स्थानिक बालनाट्य (एकांकिका) स्पर्धा पार पडतील व त्यानंतर आंतरराज्य स्पर्धेला दुपारी ३ वाजता सुरुवात होईल.
प्रवेश निशुल्क
रसिकांसाठी प्रवेश निशुल्क असून केवळ संघाना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होऊ नये. यासाठी प्रयोगाच्या वेळेत प्रवेश देता येणार नाही.याची सर्वांनी नोंद घ्यावी.
Belgaum Varta Belgaum Varta