

बेळगाव : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेने मालवण येथील चिवला बीच येथे सागरी जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे, मुंबई,कोल्हापूर,सातारा, कराड, इचलकरंजी, नाशिक, सोलापूर, गुजरात, बेळगाव, हुबळी, धारवाड, बेंगलोर, पंनजीम गोवा, येथील जवळजवळ एक हजार जलतरण पटूनी भाग घेतला होता. या स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत मोहित राहुल काकतकर याने दोन किलोमीटरच्या जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक व चषक संपादन केला. इतर जलतरणपटूनी विविध वयोगटात पाच, तीन, दोन व एक किलोमीटर स्पर्धा अत्यंत चिकाटीने पूर्ण केली.
यशस्वी जलतरणपटूंची नावे पुढीलप्रमाणे
पाच किलोमीटर स्पर्धेत कुमार स्मरण मंगळूरकर चौथा क्रमांक, प्रसाद सायनेकर सहावा क्रमांक, कुमारी किमया गायकवाड चौथा क्रमांक, प्राची नाकाडी आठवा क्रमांक.
दोन किलोमीटर स्पर्धेत मोहित काकतकर प्रथम क्रमांक ,कुमारी अमूल्या केस्टिकर सातवा क्रमांक, अथर्व अवस्ती आठवा क्रमांक,
एक किलोमीटर कुमारी आरोही अवस्थी चौथा क्रमांक, हर्षवर्धन कर्लेकर दहावा क्रमांक. याचबरोबर प्रजित मयेकर, वर्धन नाकाडी, आरुष पिसे, सुप्रीत चिगरे, आणिका बर्डे, आस्ता काकडे, द्विती राजगोळकर यांनी स्पर्धा यशस्वी पूर्ण केली.
वरील सर्व जलतरणपटूंना रोख रक्कम मेडल व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या सर्व जलतरणपटूंना एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, संदीप मोहिते, किशोर पाटील, सतीश धनुचे यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच आबा हिंदी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष श्री. शितल हुलभत्ते, श्री. अरविंद संगोळी, श्री. राजू मुंदडा, सौ. शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभते.
Belgaum Varta Belgaum Varta