
बेळगाव : गणेशपूर बेळगाव येथील रहिवासी अलका बसवंत पाटील (वय 52 वर्ष) रा. पाटील गल्ली गणेशपूर या महिलेचा मृतदेह आज सकाळी एका विहिरीमध्ये आढळून आल्याची माहिती कॅम्प पोलीस स्थानकाला मिळाली. ही बाब लक्षात येतात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कॅम्प पोलीस स्थानकातून एच. ई. आर. एफ.-हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फौंडेशनच्या रेस्क्यू टीमला दूरध्वनी मार्फत माहिती देण्यात आली. सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. रेस्क्यू टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ, अभिषेक येळूरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच कॅम्प पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांच्या मदतीने अत्यंत सुरक्षित पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले आणि केवळ 15 ते 20 मिनिटाच्या आत विहिरीतून मृतदेह बाहेर काढून तो प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.


Belgaum Varta Belgaum Varta