बेळगाव : बेळगाव शहराच्या उत्तर भागात आमदार अनिल बेनके यांनी बारा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना गुरुवारी चालना दिली. मूलभूत सुविधा, रस्ते, नाला, ड्रेनेज, सीडी वर्क अश्या विविध विकासकामाना अनिल बेनके यांनी सुरुवात केली.
ढोर गल्ली, भडकल गल्ली, कोतवाल गल्ली रोड या ठिकाणचे काँक्रिटचे रस्ते हनुमान नगर टीव्ही सेंटरमधील शाहूनगर भागातल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार आणि बेनके यांनी केलं.