
येळ्ळूर : तळागळातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून विभागवार बैठका घेवून समितीला बळकटी देण्याबरोबर दैनंदिन समस्या जाणून घेण्यासाठी परमेश्वर मंदिर येथे विभागवार बैठक घेऊन संघटना बांधणीचे रणसिंग फुंकण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे जेष्ठ कार्यकर्ते बाबू यल्लापा कंग्राळकर होते.
प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविक भाषणात सीमा चळवळीचा आढावा घेत मराठी जनतेने संघटीत राहून सरकारशी दोन हात केले पाहिजे. 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे म्हणून आम्ही संघटित राहिले पाहिजेत, असे सांगून सर्वांचे स्वागत केले. बैठकीला मार्गदर्शन करताना निवृत्त मुख्याध्यापक पुंडलिक कंग्राळकर यांनी मराठी जनतेने एका विचाराने आणि ध्येयाने भगव्या झेंड्याखाली एकत्र आले पाहिजे तरच मराठी माणसांची ताकद वाढणार असल्याचे सांगितले. ग्राम पंचायतीचे माजी उपाध्यक्ष दुद्दापा बागेवाडी यांनी आपलं काम प्रामाणिकपणे करत सीमा लढ्याला आणि गावच्या विस्कटलेल्या घडीला संघटीतपणे योग्य दिशा देण्यासाठी काम करण्याचे प्रतिपादन केले. माजी एपीएमसी सदस्य वामनराव पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य राजू पावले यांनी येणाऱ्या सर्व जबाबदारी समितीच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहून समितीचा भगवा झेंडा डौलाने फडकत ठेवण्यासाठी कार्यरत राहू, असे सांगितले. श्रीकांत नांदूरकर यांनी सीमा लढा आणि ग्रामपंचायतीच्या दैनंदिन समस्यावर आपले परखड विचार मांडले. अनेक कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दता उघाडे यांनी योग्य शब्दात त्यांच्या शंकांचे निरसन केले.
बैठकीचे अध्यक्ष बाबू यल्लापा कंग्राळकर यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागातून सीमा लढ्याला बळकटी प्राप्त होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने त्यागाची भुमिका ठेवावी, असे सांग अशा या बैठका घेण्याच्या भुमिकेचे मनापासून स्वागत केले.
यावेळी सुरज गोरल, सतीश देसुरकर, शिवाजी सायनेकर, प्रकाश पाटील, प्रकाश मालुचे आदि कार्यकर्त्यांनी संघटना बळकटी संदर्भात विचार व्यक्त केले.
या बैठकीस कृष्णा शहापूरकर, बाळकृष्ण पाटील, कृष्णा बिजगरकर, भिमराव पुण्याण्णावर, रामचंद्र कुगजी, रमेश धामणेकर, परशराम बिजगरकर, प्रभाकर कंग्राळकर, संजय हुंदरे,
रामा पाखरे, परशराम पाटील, भावकाना कुगजी, पंकज धामणेकर, सुरज पाटील आदि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नागेश बोभाटे यांनी आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta