बेळगाव : वद्य श्रीशके 1610 दिनांक 11 मार्च 1689 हौतात्मा दिन तेंव्हापासून प्रत्येक वर्षी एक महिना बलिदान मास म्हणून पाळला जातो. या महिन्यामध्ये शंभुभक्त पायात चप्पल न घालता व आपले आवडते अन्न वर्ज करुन दररोज सकाळ व सायंकाळी फोटोपूजन करतात.
या बलिदान मासाला एक महिना झाला असून शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासची सांगता आज शुक्रवारी धर्मवीर संभाजी चौक येथे छत्रपती श्री संभाजी महाराज मुर्ती पूजन करुन दि. 1 एप्रिल 2022 रोजी बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग यांच्यावतीने करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर व तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्याहस्ते पुजन करण्यात आले.
याप्रसंगी बलिदान मास पुजन सांगता कार्यक्रम प्रसंगी शहरप्रमुख दिलीप बैलुरकर, उपशहरप्रमुख राजु तुडयेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, तानाजी पावशे, प्रदीप सुतार, प्रकाश हेब्बाजी, विनायक कोवाडकर, राजु कणेरी, विठ्ठल हुंदरे, बाळासाहेब डंगरले, महिपाल इत्तापाचे व इतर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …