बेळगाव : पुनर्निर्मित नव्या बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर बसविण्यात आलेल्या महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या प्रतिमांमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अभाव आहे ही अत्यंत दुर्दैवी व खेदाची बाब आहे.
तेव्हा केंद्र सरकारने बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील महापुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमानमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचा अंतर्भाव करावा, अशी मागणी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.
बेळगाव रेल्वे स्थानक येथे आज शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुतालिक यांनी उपरोक्त मागणी केली. ते म्हणाले की, पुनर्निर्मित नव्या बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील भिंतीवर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, संगोळी रायण्णा, कित्तूर राणी चन्नम्मा अशा महापुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. तथापि दुर्देव आणि खेदाची बाब म्हणजे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रतिमा नाही.
माझी केंद्र सरकारकडे मागणी आहे की शिवरायांच्या प्रतिमेला रेल्वे स्थानकासमोरील महापुरुष व क्रांतीकारांचा प्रतिमांमध्ये स्थान दिले जावे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःसाठी भाषेसाठी अथवा एखाद्या जातीसाठी नव्हे तर संपूर्ण देश हितासाठी लढा उभारला. तेंव्हा त्यांची प्रतिमा देखील रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी असणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते.
महापुरुष व क्रांतीकारांच्या प्रतिमांमध्ये हिंदू संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या हिंदु राष्ट्राची स्थापना करणार्या या महापुरुषाची प्रतिमा नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. तरी केंद्र सरकार आणि या भागाच्या खासदारांकडे माझी मागणी आहे की त्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील महापुरुष व क्रांतीकारांचा प्रतिमांमध्ये अंतर्भाव करावा अशी माझी मागणी असून छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी खासदारांनी केंद्राकडे आग्रह धरावा, असे प्रमोद मुतालिक यांनी स्पष्ट केले.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …