
कुडची : सिमेंटने भरलेली लॉरी उलटून शाळेला जाणारा विद्यार्थी जागीच ठार झाला. दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरीजवळ ही घटना घडली. कुडचीहून हारुगेरीकडे जाणारी सिमेंटची लॉरी वळणावर उलटली आणि शाळेत जाणाऱ्या मुलांवर पडली.
या दुर्घटनेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अमित कांबळे (११) विद्यार्थी याचा मृत्यू झाला. अंजली कांबळे (१५) आणि अविनाश कांबळे (१४) गंभीर जखमी झाले. ही घटना कुडची पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Belgaum Varta Belgaum Varta