Tuesday , March 3 2026
Breaking News

श्री चांगळेश्वरी हायस्कूलमध्ये शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन कार्यक्रम हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य श्री. वाय. एन. मजुकर संस्थापक श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ हे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री. यल्लूप्पा आप्पांना पाटील, माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी श्री. चेतन हुंद्रे, सिविल इंजिनियर श्री. चेतन प्रकाश पावले व रेडिमड कपड्यांचे व्यापारी श्री. नरेश गुंगोमन, उद्योजक व शिक्षणप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. नागराज रतन वडगाव व संस्थेचे संचालक श्री एन. वाय. मजूकर,, सचिव श्री. प्रसाद मजुकर, प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आय. बी. राऊत इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या इशस्तवन आणि स्वागत गीताने झाले. त्यानंतर श्री चांगळेश्वरी देवी फोटो पूजन संस्थेचे सचिव श्री. प्रसाद मजुकर, सरस्वती देवी फोटो पूजन माजी विद्यार्थी श्री. चेतन हुंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामणेकर यांनी करून उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
क्रीडा ध्वजाचे पूजन आणि ध्वजारोहण श्री यल्लूप्पा आप्पांना पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच क्रीडा साहित्य पूजन इंजिनियर चेतन पावले आणि ग्राउंडचे पूजन श्री. नरेश गुंगोमन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसाद मजूकर आणि श्री चेतन हुंदरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना खेळांसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात श्री. वाय. एन. मजुकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी खेळ, भावना जपून खेळावे आणि उच्च स्तरावरील जिल्हा पातळी किंवा राज्य पातळीवर स्पर्धेपर्यंत जाण्याच्या दृष्टीने खेळामध्ये सातत्य टिकून ठेवावे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरून स्पर्धेमध्ये पोहोचून खेळाचा फायदा घेता येईल असे सांगितले. खेळामध्ये पंच म्हणून कार्य करणाऱ्या निर्णायकानी कोणताही भेदभाव न करता अचूक निर्णय देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे सुचित केले. त्यानंतर हॉलीबॉल स्पर्धांचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते श्री. नागराज रतन यांच्या हस्ते करून रीतसर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एल. एस. बांडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. वाय. बी. कंग्राळकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. एम. एम. डोंबले यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी हायस्कूलच्या सर्व शिक्षकानी हातभार लावला.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *