Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर तालुका पंचहमी योजनेची मासिक बैठक संपन्न; पाचही गॅरंटींचा सविस्तर आढावा

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका गॅरेंटी योजनेची मासिक बैठक आज रोजी दिनांक 30.12.2025 रोजी तालुका पंचायत नूतन बैठक हॉलमध्ये घेण्यात आली. या बैठकीमध्ये गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी अध्यक्ष म्हणून होते. या बैठकीमध्ये पाच गॅरेंटीचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रथम महिला बालकल्याण खात्याचे अधिकारी बजंत्री यांनी गृहलक्ष्मीबाबत सविस्तर माहिती दिली. आत्तापर्यंत 24 वा हप्ता जमा झाला आहे असे त्यांनी गॅरंटी योजनेच्या बैठकीत सांगितले.

यावेळी गॅरेंटी योजनेचे सदस्य प्रकाश मादार यांनी सीडीपीओ बजंत्री यांना आपल्या ड्युटीबद्दल चांगलेच धारेवर धरले, आपण ऑफिसमध्ये येत नसल्यामुळे लोकांची गृहलक्ष्मी योजनेची कामे होत नाहीत, तरी आपण ऑफिसला वेळेवर उपस्थित रहावे नाहीतर आपले आपण बदली करून घेऊन दुसऱ्या तालुक्यात जावे असा सज्जड दम दिला. या सीडीपीओ बजंत्री यांनी यावेळी उपस्थित राहून लोकांची चांगले कामे करून देईन अशी ग्वाही दिली. भाग्यज्योतीचे मुख्य अधिकारी प्रवीण बरगाले यांनी भाग्य ज्योती योजनेविषयी बरीच माहिती दिली व अजूनही काही लोकांनी आपल्या नावे दोन दोन मीटर असलेले लोकांनी एक एकच भाग्य ज्योतीचे रजिस्ट्रेशन केल्यामुळे एक मीटरचे वीज बिल माफ होत आहे, दोन्ही मीटरचे रजिस्ट्रेशन केल्यास दोन्ही मीटरचे विज बिल माफ होते असे त्यांनी सांगितले. याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, यावेळी सदस्य रुद्राप्पा पाटील व शांताराम गुरव, दीपा पाटील यांनी आपापल्या भागातील अडचणी प्रवीण बरगाले यांना सांगितल्या. त्या अडचणी दोनच दिवसात त्या त्या भागातील पूर्ण केल्या जातील असे सांगण्यात आले, व अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी काल ऊसाला लागलेल्या आगीबद्दल काय आढावा घेतला याची माहिती विचारली असता जळगे व हत्तरवाड येथील पंचनामा चालू असून दोन दिवसात पंचनामा पूर्ण करून कळवतो असे सांगितले. शक्ती योजनेचे खानापूर डेपोचे नियंत्रक (कंट्रोलर) शंकर दुर्गावि यांनी शक्ती योजना संदर्भातील बस व्यवस्थेची माहिती रीतसर दिली. या वेळी गॅरेंटी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी त्यांना गुंजी येथे सर्व बस थांबतात का? असे विचारले असता यावेळी सांगितले आता थांबायला चालू झाले आहेत काही थांबत नाही त्या पण थांबवल्या जातील असे त्यांनी सांगितले. अन्नभाग्य योजनेचे अधिकारी कोणीही या मिटींगला उपस्थित नव्हते, या
अन्नभाग्य विभागाचे अधिकारी शिरस्तेदार जांभळे, फूड इन्स्पेक्टर यमकनमर्डी व खातेदार यांचेवर कायदेशीर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात नोटीस काढावी असा आदेश देण्यात आला आहे. युवा निधीचे अधिकारी संपत कुमार यांनी कळविल्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यापर्यंत लाभार्थ्यांना अनुदान मिळाले आहे असे सांगण्यात आले. बैठकीमध्ये गॅरंटी योजनेचे सदस्य प्रकाश मादार, बाबू अत्तरवाड, विवेक तडकोड, रुद्राप्पा पाटील, राजा कुडाळे, शांताराम गुरव, प्रियांका गावकर, दीपा पाटील, जगदीश पाटील, व गॅरंटी योजनेचे कार्यदर्शी रमेश मैत्री, तालुका पंचायतचे मॅनेजर श्रीकांत सपटला बैठकीला उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अंबोली घाटात दरड कोसळली; बेळगाव – सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *