Friday , April 17 2026
Breaking News

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेळगाव शहर सज्ज; कॅम्प परिसर ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी गजबजला

Spread the love

 

बेळगाव : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची बेळगावकरांची एक अनोखी परंपरा आहे. बेळगावसह परिसरात सरत्या वर्षाला निरोप देत असताना ‘ओल्डमॅन’चे दहन परंपरा आहे. काळानुसार या परंपरेने व्यापक रूप धारण केले असून बेळगाव येथील कॅम्प परिसर ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी गजबजून गेला आहे. ओल्डमॅन बनविणाऱ्या कलाकारांनी आपली कल्पकता दाखवत विविध प्रतिकृतींच्या ओल्डमॅनची निर्मिती केली आहे. यंदा धुरंदरच्या लुक मधील सात फूट उंचीची ओल्ड मॅनची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. यावर्षी 4000 रुपयापासून ते तब्बल 12 हजार रुपयांपर्यंतच्या ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी कॅम्प परिसरात उपलब्ध झाल्या आहेत. बेळगाव शहरातील कॅम्प परिसर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला असून सरत्या वर्षाला निरोप देताना ओल्डमॅन दहन करण्याची लगबग या भागात दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर शहरातील गल्लीबोळात घरातील जुने कपडे, गवत आणि कागदाच्या रद्दीपासून ओल्डमॅन तयार करण्यात व्यस्त असलेले बालगोपाळ देखील पहावयास मिळत आहेत. यावर्षी बाजारपेठेत अक्षय खन्ना स्टाईल धुरंदर या नावाने ओल्ड मॅन पहावयास मिळत आहेत. 25 फुटी ओल्ड मॅन साकारून बेळगावकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर्षी वेब सिरीज मधली “द सीआर” या पात्रावर आधारित ओल्डमॅनची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सिरीज मधील त्या पात्राप्रमाणे विद्रूप चेहरा असलेली आणि बसण्याची विशिष्ट पद्धत असलेली ओल्डमॅनची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हे रहस्यमय रूप पाहण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असताना ओल्डमॅनची प्रतिकृती दहन करण्याची परंपरा असल्याने कॅम्प परिसरात ओल्डमॅन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. प्लास्टिक पोती, पुठ्ठा, भुसा, रंगीबेरंगी पेपर आदि साहित्य वापरून ओल्डमॅनच्या प्रतिकृती तयार केल्या जातात. सेंट झेवियर स्कूल तसेच खानापूर रोडवरील मोकळ्या जागांवर कारागिरांनी विविध आकर्षक असे ओल्डमॅनच्या प्रतिकृती प्रदर्शनाने विक्रीसाठी मांडल्या आहेत. दरवर्षी विविध रूपातील ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी उपलब्ध असतात यावर्षी मात्र ओल्डमॅन सोबत ओल्ड लेडीची प्रतिकृती देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे.

About Belgaum Varta

Check Also

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी

Spread the love  पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *