
बिजगर्णी… येथील निवृत्त शिक्षक एस. आर मोरे यांनी आपल्या गावातील प्राथमिक शाळेला बावीस हजार रुपयाचे किंमती कपाट भेट देऊन ऋण व्यक्त केले. साठ वर्षांपूर्वी त्यांचे प्राथमिक शिक्षण याच आपल्या मूळ गावी येथे झाले.
महत्वाचे कागदपत्रे ठेवण्यासाठी कपाटाची आवश्यकता असल्याचे मुख्याध्यापक पी. के. पाटील यांनी वाय पी नाईक यांच्याकडे बोलले होते. त्वरीत नाईक यांनी पी. पी. बेळगावकर यांच्याशी संपर्क साधून मोरे यांना बेंगलोर येथे संवाद साधला.
शाळा हे ज्ञानाचे केंद्र असून आपलं गाव व ज्या शाळेने मोठं केलं, न विसरता ऋण व्यक्त करणं हे आद्य कर्तव्य आहे ही भावना मनी बाळगून एस आर मोरे यांनी कपाट भेट देऊन दातृत्वदाखवले त्याबद्दल बिजगर्णी प्राथमिक शाळेत सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस डी सी कमिटीचे अध्यक्ष भाऊराव जाधव उपस्थित होते.
विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. मान्यवराच्या हस्ते श्रीफळ वाढवून, दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी पी पी बेळगावकर, वाय पी नाईक, एस आर मोरे यांनी मनोगत व्यक्त करुन शाळा हेच प्रत्येकाचं आयुष्य घडवत असते. शाळेतील संस्कार एक शिदोरी असते असे मौलिक विचार व्यक्त केले.
व्यासपीठावर ग्रामपंचायत उपाध्यक्ष महेश पाटील, संतोष कांबळे, पुंडलिक जाधव, मनोहर बेळगावकर, निंगापा जाधव, बबलू नावगेकर, दयानंद यळूरकर, संतोष दरेकर, सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला परशराम भास्कर, केदारी कणबरकर, राजू बुरुड, शिक्षक तेजस्विनी कांबळे, नीता अष्टेकर, संगीता हलकर्णीकर, सदस्या सौ. मलप्रभा जाधव, सी टी कोलकार, प्रभाकर जाधव, यशवंत जाधव तसेच पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून शाळांना सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यामुळे समाधान व्यक्त केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक पी के पाटील, आभार ऍड नामदेव मोरे यांनी मानले. सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta