Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठी भाषिकांवरील अत्याचार त्वरित थांबवा; येळ्ळूर समितीचा प्रशासनाला इशारा

Spread the love

 

येळ्ळूर : सीमाभागात येणकेण प्रकारे सामाजिक सलोखा बिगडविण्याचे काम सातत्याने घडत आहे. जाणून बूजून मराठी नामफलक फाडण्याचे काम समाजकंटकांनी राजरोसपणे सुरु आहे. कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही पोलीस प्रशासनाचा धाक उरलेला नाही. यांना वेळीच आवरा नाही तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मराठी जनता समर्थ आहे, असा कडक इशारा येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने संघटना बळकटी संदर्भात सिध्देश्वर मंदिर येथे आयोजित केलेल्या बैठकीत देण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य यल्लापा गुंडू गोरल होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक प्रकाश अष्टेकर यांना केले.
या बैठकीत रमाकांत दादा कोंडुस्कर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे मराठी प्रसिद्धी फलक फाडण्याचे निच कृत्य कांही समाजकंटकांनी करुन माणूसकीला काळीमा फासला आहे. त्यांचा या बैठकीत निषेध करण्यात आला. त्याचबरोबर मराठी माणसाचे संविधानीक हक्क मिळवण्यासाठी झगडणारे युवा नेते शुभम शेळके यांच्यावर बेकायदेशीररित्या पोलिस प्रशासन त्रास देत आहे. त्याही घटनेचा या बैठकीत निषेध करण्यात आला.
या बैठकीत वामनराव पाटील यांनी मराठी भाषिकांनी आपले न्याय हक्क आबाधित ठेवण्यासाठी एकसंघ राहून कार्य करण्याचे आवाहन केले. दुद्दापा बागेवाडी यांनी येळ्ळूर प्रत्येक लढ्यात अग्रेसर आहे. यापुढील काळात येळ्ळूरवासियांची एकजूट महत्वाची असल्याचे प्रतिपादन केले. दत्ता उघाडे यांनी येळ्ळूरने सीमालढा ताकतीने लढवला. यापुढील काळात तोच जोम टिकून राहिला पाहिजेत, असे सांगितले.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती बळकटी संदर्भात सुचना करून कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी समितीने विषेश पुढाकार घ्यावा, असे सुचविण्यात आले.
यावेळी राजू पावले, सूरज गोरल, बी. एन. मजुकर यांची भाषणे झाली.
या बैठकीस चांगदेव परीट, नेताजी गोरल, दयानंद उघाडे, राकेश परीट, प्रकाश पाटील, शिवाजी कदम, कृष्णा बिजगरकर, कृष्णा शहापूरकर, सतीश देसुरकर, तानाजी पाटील, नंदकुमार पाटील, भिमराव पुन्याणावर, नरेश मंगणाईक, जोतीबा परीट, राजू पाटील, आनंदा कंग्राळकर, रमेश धामनेकर, परशराम मालुचे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” : हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *