Monday , September 21 2026
Breaking News

हिंडलगा कारागृह परिसरात गस्त वाढवणार : पोलिस आयुक्त

Spread the love

 

बेळगाव : हिंडलगा कारागृहात अंमली पदार्थ फेकल्याच्या पार्श्वभूमीवर कारागृह परिसरात गस्त वाढवणार असल्याची माहिती हिंडलगा कारागृहाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी माध्यमांना दिली.

पुढे बोलताना आयुक्त म्हणाले की, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही चौकशी करू. कोणता कॅमेरा आणि कोणती तारीख आधी तपासू. कारागृहात मोबाईल फोन आणि अंमली पदार्थ फेकल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारीत झाले आहे. म्हणून, आम्ही त्याबद्दल चौकशी करण्यासाठी आलो आहोत.

केआयएसएफ कर्मचाऱ्यांनी याची काळजी घ्यावी. ग्रामीण पोलिस आणि केएसआयएफ कर्मचारी गस्त वाढवतील. आम्ही आमच्याकडून सुरक्षा प्रदान करू, असेही पोलिस आयुक्त म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *