Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर- बेळगाव महामार्गावरील प्रभुनगर पुलावर दुचाकी अपघात; खानापूरचा युवक ठार, एक गंभीर जखमी

Spread the love

 

खानापूर : खानापूर – बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील प्रभुनगर पुलावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात खानापूर येथील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच ही हृदयद्रावक घटना घडल्याने खानापूर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर येथील निंगापूर गल्ली येथील युवक सुरज संजय कुंडेकर (वय 22) व दुर्गानगर येथील गणेश बुचडी (वय 23) हे दोघे युवक ३१ डिसेंबरच्या निमित्ताने एका धाब्यावर जेवण करून दुचाकीवरून खानापूरकडे परतत होते. दरम्यान प्रभुनगर येथील महामार्गावरील पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या बाजूच्या संरक्षक कठड्याला जोरदार धडकली.
या अपघातात दुचाकीवरील दोघेही युवक उडून थेट पुलाखालील सर्विस रस्त्यावर कोसळले. यामध्ये सुरज कुंडेकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला तातडीने बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गणेश बुचडी याला पुढील उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक पण स्थीर असल्याचे समजते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *