Tuesday , March 3 2026
Breaking News

कालीमिर्ची यांनी स्वीकारला मार्केट पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार

Spread the love

 

बेळगाव : बेळगावचे लोकप्रिय पोलीस अधिकारी जे एम कालीमिर्ची यांनी मार्केट पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे मार्केट विभागाच्या सुरक्षेची जबाबदारी आता एका अनुभवी अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे.

जे एम कालीमिर्ची यांनी मार्केट पोलीस निरीक्षक म्हणून अधिकृतपणे पद स्वीकारले आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले महंतेश धामण्णवर यांची बदली झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागी सायबर, आर्थिक गुन्हे आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जे एम कालीमिर्ची यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला. शासनाच्या या आदेशानुसार कालीमिर्ची यांनी आज पदभार स्वीकारला.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *