
बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दावा क्रमांक ४/२००४ मूळ दाव्याची सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर न्यायालयासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे यासाठी उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तज्ञ कमिटी अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

२१ जानेवारी २०२६ पासून होणाऱ्या सलग सुनावणीपूर्वी सीमाप्रश्नी कायदेशीर रणनीती आखणे, साक्षीदारांची शपथपत्रे त्याबरोबर पुरावे यांची पूर्वतयारी आणि वरिष्ठ वकिलांच्या सल्लामसलती करण्यासाठी उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक होणे गरजेचे असल्याचे २७ डिसेंबर २०२५ रोजी धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. २०१४ नंतर सीमा प्रश्नाचे न्यायालयीन लढ्याला पुन्हा एकदा गती मिळालेली आहे. लढा सध्या निर्णायक टप्प्यावर आलेला आहे. अशावेळी महाराष्ट्र शासनाची तयारी कशा पद्धतीने आहे याकडे सीमा भागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta