बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संचलित मुतगे येथील पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये पारितोषिक वितरण सोहळा व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे चेअरमन आर. वाय. पाटील उपस्थित होते.
प्रमुख वक्ते म्हणून ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयाच्या डॉक्टर प्राध्यापिका श्रीमती माधवी बाघी या उपस्थित होत्या.
विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य श्री. एस. एस. जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच प्राध्यापिका श्रीमती ज्योती जाधव यांनी वार्षिक अहवाल सादर केला. प्राध्यापिका आर. वाय. बडेघरवाले व प्राध्यापक दिनकर पाटील यांनी क्रीडा स्पर्धांचा निकाल जाहीर केला.
गुणी विद्यार्थी खेळाडूंचा गौरव करण्यात आला उत्कृष्ट खेळाडू म्हणून ब्रह्मानंद बल्लारी व आरती गुत्ती तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून आरती चौगुले यांची निवड करण्यात आली. तसेच तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती गटामध्ये क्रमांक मिळवलेला कॉलेजचा विद्यार्थी आर्यन चौगुले याचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी शाळा सुधारणा समितीचे सदस्य तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक बी बी कोंडस्कोप व प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक एस आर तीरवीर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्याने आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करावी जीवनात कसे पुढे जावे संयम कसा बाळगावा रागावर नियंत्रण कसा ठेवावा याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका एस आर शिर्लेकर यांनी केले तर प्राध्यापिका शितल बेळगावकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta