Monday , April 20 2026
Breaking News

आमदार लक्ष्मण सवदी यांनी डीसीसी बँकेत येऊन माफी मागावी

Spread the love

 

बेळगाव : आमदार लक्ष्मण सवदी यांनी ७ दिवसांच्या आत डीसीसी बँकेत येऊन माफी न मागितल्यास जिल्हाभरात बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा डीसीसी बँक कर्मचारी युनियनने दिला आहे.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांवर आमदार लक्ष्मण सवदी यांनी हल्ला केल्याचा आणि खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करत आज कर्मचाऱ्यांनी शहरात भव्य निषेध मोर्चा काढला. यावेळी आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या प्रकरणाबाबत बोलताना कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आनंद पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. डीसीसी बँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांवर हल्ला झाला असून, आमदार सवदी यांनी कोणतीही सुरक्षा दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. येत्या १२ जानेवारीपर्यंत आमदारांनी माफी न मागितल्यास बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्रास देण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही, परंतु कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने आम्हाला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले,  असे त्यांनी म्हटले. या आंदोलनात डीसीसी बँक कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *