बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी प्रकरणांची मालिका सुरू आहे. एका पतीने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतःलाही गळफास लावला. सदर घटना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, यल्लव्वा नामक महिलेच्या आईचे निधन होऊन एक आठवडा झाला होता. ती धार्मिक विधी करण्यासाठी घरी जाण्याची तयारी करत होती. पण तिचा पती शिवप्पा तिला घरी जाऊ नये म्हणून बजावत होता. यामुळे किरकोळ वाद होऊन पतीने यल्लव्वाच्या मानेवर आणि पाठीवर वार केले. यल्लव्वाचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीचा मृत्यू होताच त्यानेही गळफास लावून आत्महत्या केली. कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta