Tuesday , March 3 2026
Breaking News

बार असोसिएशन अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री. शीतल रामशेट्टी यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : होसूर मधील प्रतिष्ठित नागरिक तसेच सरकारी वकील श्री. महावीर रामशेट्टी यांचे चिरंजीव वकील श्री. शीतल महावीर रामशेट्टी यांची बेळगाव वकील बार असोसिएशन अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच होसूर मधील प्रतिष्ठित नागरिक व मराठा मंगल कार्यालयाचे संचालक श्री. मारुती डोळेकर यांची कन्या प्रीती मारुती डोळेकर यांनी वकिली ही पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला. श्री गणेश मंदिर मराठा मंगल कार्यालयाच्या वतीने अध्यक्ष रवींद्र भोसले तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित संचालक भाऊराव सैनूचे, मारुती डोळेकर, आनंद जाधव, बाळासाहेब भोसले, मारुती हलगेकर, कल्लापा शहापूरकर, विनायक शहापूरकर, प्रशांत भातकांडे, सेक्रेटरी सुरेश सैनूचे, मॅनेजर रेश्मा मंडोळकर तसेच भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *