बेळगाव : १७ जानेवारी हुतात्मा दिन व सीमा लढ्याच्या पुढील वाटचालीबद्दल विचारविनिमय करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे बैठक गुरुवार दिनांक १५ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या हुतात्माना अभिवादन करण्यासंदर्भात, सद्यस्थितीत सीमाभागातील मराठी भाषेवरील अन्यायाविरोधात व सीमालढ्याबाबत कार्यकर्त्यांचे विचार ऐकण्यासाठी व पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण या घटक समितीचे सदस्य, युवा व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, विठ्ठल पाटील, मोनापा पाटील व लक्ष्मण होनगेकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta