Monday , April 20 2026
Breaking News

प्रभाग २९ चा संघ ठरला ‘मालक’ चषकाचा मानकरी

Spread the love

 

प्रभाग ‌३० चार संघ उपविजेता; ३१ प्रभागातील संघाचा सहभाग

निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर सलग पाच दिवस प्रकाश झोतातील प्रभाग नुसार क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतील अंतिम सामना वार्ड क्रमांक २९ व वार्ड क्रमांक ३० यांच्यात झाला. प्रथम वार्ड क्रमांक २९ संघाने निर्धारित सहा षटकांत ७७ धावा जमवल्या. प्रत्युत्तरा दाखल खेळताना वार्ड क्रमांक ३० संघाला केवळ ५७ धावांपर्यंत मजल मारता आली. परिणामी वार्ड क्रमांक २९ संघ निपाणीतील पहिल्या डे–नाईट वार्डनिहिय मालक चषक २०२६ चा मानकरी ठरला. या संघाला रोख ५१ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. प्रथमच झालेल्या डे–नाईट वार्डनिहित क्रिकेट स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत निपाणी शहरातील ३१ वार्डांतील संघांनी सहभाग नोंदवला होता.
अंतिम पाचव्या दिवशी चौथ्या फेरीचे उपांत्यपूर्व फेरी चार सामने, उपांत्य फेरीचे दोन सामने आणि अंतिम सामना खेळवण्यात आला. उपांत्यपूर्व फेरी व उपांत्य फेरीत चुरशीच्या लढती झाल्या.
उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात वार्ड क्रमांक १९ व वार्ड क्रमांक ३० यांच्यात लढत झाली. शेवटच्या षटकात १८ धावांची गरज असताना फलंदाज राजू तेवर यांनी विलक्षण आत्मविश्वास आणि चिकाटी दाखवत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह वार्ड क्रमांक ३० संघाने अंतिम फेरीत धडक मारली.
दुसऱ्या उपांत्य फेरीत वार्ड क्रमांक २३ व वार्ड क्रमांक २९ हे संघ आमनेसामने आले. उत्कृष्ट फलंदाजी, अचूक, प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर वार्ड क्रमांक २९ संघाने हा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामनावीर म्हणून बंटी कांबळे उत्कृष्ट गोलंदाज सोनू उर्फ अनिकेत लोहार, उत्कृष्ट फलंदाज सद्दाम बडेघर, मालिकावीर
अभिजीत सांडूगडे, उदयोन्मुख खेळाडू म्हणून शुभम अस्वले यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेचे प्रमुख आयोजक रोहन साळवे यांनी, शहरातील खेळाडूंना अधिक संधी मिळाव्यात, स्थानिक क्रीडावंतांचा आत्मविश्वास वाढावा आणि टेनिस बॉल क्रिकेट आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जात असल्याने निपाणीचे नाव देशपातळीवर उजळावे, या उद्देशानेच या डे–नाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भविष्यात मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरवून अनेक खेळाडूंना देश पातळीपर्यंत पोहोचवणे हे आपले ध्येय असल्याचे सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *