Tuesday , March 3 2026
Breaking News

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; शहर समितीच्या बैठकीत आवाहन

Spread the love

 

बेळगाव : 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी त्याचप्रमाणे 21 जानेवारीपासून सीमाप्रश्नासंदर्भात होणाऱ्या सलग सुनावणीबाबत विचार विनिमय करण्यासाठी रंगुबाई पॅलेसमध्ये आज गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी शहर समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक रणजीत चव्हाण पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना मालोजी अष्टेकर म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात 1956 मध्ये हौतात्म्या पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 17 जानेवारी रोजी बेळगावसह सीमाभागात हुतात्मा दिन पाळण्यात येतो. यावर्षी देखील हुतात्मा चौक येथे सकाळी 9.30 वाजता मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन करावे आणि श्रद्धांजली व्हावे, असे आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आले.

मराठी फलकांवर वक्रदृष्टी टाकणाऱ्या कन्नड संघटना तसेच मराठी भाषा आणि मराठी नेत्यांविरुद्ध गरळ ओकणाऱ्या कन्नड संघटनांना सडेतोड उत्तर देण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यातून झाली. याबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने व्यापक बैठक बोलून जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासंदर्भात रूपरेषा निश्चित करण्यात येेेणार असल्याचे सांगितले.

सीमा प्रश्न महाराष्ट्र सरकार उदासीन धोरण अवलंबत असल्याबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी कडक शब्दात ताशेरे ओढत महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, येत्या दोन दिवसात सीमा प्रश्नी कामकाज पाहणाऱ्या वकिलांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सीमालढा यापुढे महाराष्ट्र सरकारच्या भरवश्यावर न लढता सीमावासीयांनी स्वतःच्या ताकदीवर लढावा लागणार असे देखील सांगितले.

या बैठकीदरम्यान बेळगावात स्थापन झालेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना तात्काळ बरखास्त करण्यात यावी असा ठराव समितीने मांडावा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करावी अशी सूचना वजा मागणी कार्यकर्त्यांनी केली.

समिती युवा नेते शुभम शेळके यांनी 17 जानेवारी रोजी युवकांनी मोठ्या संख्येने हुतात्मा चौकात जमावे व हुतात्म्यांना अभिवादन करावे असे आवाहन केले. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली.

या बैठकीला रमाकांत कोंडुसकर, ऍड अमर यळ्ळूरकर, मदन बामणे, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शिवाजी हावळणाचे, उमेश पाटील, शिवराज पाटील, अनिल अंबरोळे, श्रीधर खन्नुकर, श्रीकांत कदम, सचिन केळवेकर, मोतेश बारदेशकर, रणजित हावळणाचे, यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *