Tuesday , March 3 2026
Breaking News

मस्णांगाई सौहार्द सोसायटीच्या वतीने शिवाजी दादा कागणीकर यांचा होणार सत्कार

Spread the love

 

बेळगाव : पर्यावरण प्रेमी जेष्ठ समाजसेवक तसेच नुकताच राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आलेल्या शिवाजी दादा कागणीकर यांचा भव्य सत्कार होणार आहे. मस्णांगाई सौहार्द सोसायटीच्या वतीने दरवर्षी गुणी विद्यार्थीचा सत्कार करण्यात येत असतो त्याच पद्धतीने यावेळी समाजकार्याला वाहून घेणारे जेष्ठ समाजसेवक शिवाजी दादा कागणीकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी ११-०० वाजता मराठी शाळेच्या प्रांगणात हा सोहळा होणार आहे. या सत्कार सोहळ्यासाठी चेअरमन व्हा.चेअरमन सेक्रेटरी सर्व संचालक व‌ सल्लागार मंडळ कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत. तरी सामाजिक कार्यकर्ते पंचक्रोशीतील तसेच गावातील युवक मंडळे महिला मंडळे पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे श्री मस्णांगाई सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *