Saturday , April 18 2026
Breaking News

निलजीत धर्मवीर छ. संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा

Spread the love

 

 

बेळगाव : निलजी (ता. जि. बेळगाव) येथे श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

निलजी गावातील धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी गजानन पाटील, रामलिंग लोहार व श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव तालुका प्रमुख भरत पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या आता तलवार घेतलेल्या पूर्णाकृती मूर्तीचे अभिषेक व पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी शंभूराजांना अभिवादन करून त्यांचा जय जयकार केला. याप्रसंगी संदीप मोदगेकर, सिद्राय हिराप्पाचे, शरद पाटील, आप्पाजी लोहार, रवी मोदगेकर, आप्पाजी गाडेकर, सचिन गोमाणाचे, कल्लाप्पा मोदगेकर, बाबाजी सुतार, मारूती हिराप्पाचे आदींसह गावकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

Spread the love  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *