Tuesday , March 3 2026
Breaking News

१७ जानेवारी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; युवा समितीच्या वतीने आवाहन

Spread the love

 

बेळगाव : १७ जानेवारी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसी मान्य करत तत्कालीन केंद्र सरकारने बेळगावसह मराठी बहुल प्रदेश कर्नाटकात डांबल्याची घोषणा केली आणि सीमाभागात उद्रेक उसळला. १७ जानेवारी १९५६ रोजी रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांवर तत्कालीन मुंबई सरकारने अमानुष गोळीबार केला त्यामध्ये पैलवान मारुती बेन्नाळकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे, मधु बांदेकर, निपाणी मध्ये कमळाबाई मोहिते यांना हौतात्म्य आले तर त्यानंतरच्या सत्याग्रहात खानापूरचे नागप्पा होसुरकर यांना पोलिस मारहाणीत हौतात्म्य आले. या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व युवा समिती पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मराठी भाषिकांनी शनिवार दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता हुतात्मा चौक बेळगाव येथे उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *