Tuesday , March 3 2026
Breaking News

हळदी-कुंकूच्या निमित्ताने महिला शक्तीचा गौरव; मण्णूरमध्ये उद्या सौभाग्य व सन्मान सोहळा…

Spread the love

 

बेळगाव : मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर व श्री आर. एम. चौगुले, मण्णूर यांच्या सौजन्याने उद्या रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता अनन्या फार्महाऊस, मण्णूर येथे पारंपरिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सौभाग्य, स्नेह आणि सामाजिक ऐक्याला समर्पित असलेला हा कार्यक्रम मण्णूरच्या सांस्कृतिक जीवनात एक आनंददायी पर्व ठरणार आहे.

या सौभाग्यपूर्ण समारंभात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे पर्यावरणवादी डॉ. शिवाजीदादा कागणीकर न्याय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या धारवाड उच्च न्यायालयातील अ‍ॅडव्होकेट तृप्ती सडेकर, तसेच राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये सुळगा गावचे नाव उज्ज्वल करणारी बीसीसीआय अंडर-१५ क्रिकेटपटू श्रेया पोटे सुळगा व प्रतिक्षा जोतिबा चौगुले मण्णूर ब्लॅक बेल्ट कराटे यांचा यावेळी गौरव होणार आहे.
याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या, महिलांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या महिला शक्तीच्या प्रतीक सौ. पुनम अमोल पाटील यांचा देखील विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर यांच्या कला क्रीडा व सांस्कृतिक विभागात तर्फे हा सन्मान केला जाणार आहे..
शिवाय श्री. आर. एम. चौगुले हे संस्थात्मक स्तरावर समाजातील सौहार्द, परंपरा आणि महिलांचा मान जपण्याचे कार्य सातत्याने करत असून, या हळदी-कुंकू समारंभातून परंपरेला सामाजिक जाणीवेची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमधील एकोपा, आत्मीयता आणि सन्मानाची भावना अधिक दृढ व्हावी, हा आयोजकांचा उद्देश आहे. मण्णूर व परिसरातील सर्व महिलांनी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सौभाग्यपूर्ण आणि प्रेरणादायी समारंभाची शोभा वाढवावी, असे भावनिक आवाहन मातोश्री सौहार्द संघ नियमित मण्णूर या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. आर. एम. चौगुले यांनी केले आहे.
हळदी-कुंकूच्या निमित्ताने सन्मान, संस्कार आणि सौहार्दाचा हा उत्सव प्रत्येक महिलेसाठी अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *