Friday , April 17 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा नूतन पोलीस प्रमुख के. रामराजन यांचा रयत संघटनेतर्फे सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगांव येथील जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांची बेंगलोर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी नूतन जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून के. रामराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त दोन्ही पोलीस प्रमुखांचा कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून रयत संघटनेच्या कार्याला नियमितपणे पाठिंबा देण्याचा आश्वासन दिले. कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, यापूर्वी भीमाशंकर गुळेद यांनी, संघटनेला सहकार्याची भूमिका दाखवली आहे. त्याप्रमाणे नूतन पोलीस प्रमुखांनी संघटनेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष चून्नापा पुजारी, शशिकांत पडसलगी, शिवानंद मुगलीहाळ, संजीव हालापणावर, प्रकाश नाईक, श्रीशैला अंगडी, आनंद गायकवाड, शिवाजी वाडेकर, शुभम मगदूम, सागर पाटील, सिद्धू मिरजे, सुनील पाटील, मधुकर पाटील, बबन जामदार, दादा चौगुले, संजय जोमा, बाबासाहेब पाटील, सचिन कांबळे, नितीन कानडे, नामदेव साळुंखे, सर्जेराव हेगडे, सागर हवले, राजू उपाध्ये, विजय गुरव यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *