बेळगाव : मलेशिया येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 पार पडली.
भारताचा संघ मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने या स्पर्धेत सहभागी झाला होता. बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात आले. यामध्ये कर्नाटक मधून बेळगाव व हुबळी येथील मल्लांची निवड झाली व त्या सर्वांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
यामध्ये श्रेयश दशरथ हट्टीकर (U-19) 65kg रौप्य पदक, सिद्धांत निकेश कडाली (U-14) 62kg कास्य पदक, शुभम मारुती हट्टीकर (सीनिअर) 70kg रौप्य पदक, विक्रम मंजुनाथ चिलनंवर (U-19) 60kg रौप्य
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पै.अतुल सुरेश शिरोले व पै. अमोल साठे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ खेळाडूंना झाला. मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया चे अध्यक्ष मा. अजयकुमार साळुंखे सर आणि उपाध्यक्ष मा. विनोद शिंदे सर यांनी सर्व पैलवानांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. भारतातून एकूण 35 खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यापैकी 6 सुवर्ण, 5 रौप्य आणि 7 कास्य पदकांसह भारतीय संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले .
या यशामुळे भारतीय कुस्तीपटूंना एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून मिशन ऑलिम्पिक गेम्स संघटना कर्नाटकचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta