Tuesday , March 3 2026
Breaking News

उचगाव गणेश मार्कंडेय तीर्थक्षेत्रेतील सभा मंडपाचे पूजन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव वेंगुर्ला रोडवर असलेल्या गणेश मार्कंडेय तीर्थक्षेत्र येथील मंदिरासमोरील सभा मंडपाचे पूजन पूजन समारंभ उचगाव ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरशे आणि काँग्रेसचे नेते जयवंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
गणेश जयंतीचे औचित्य साधून मंदिराला रंगरंगोटी समोरील पेवर्स आणि सभामंडप असे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले असून सदर कार्यक्रमाला मोठ्या जोरात सुरुवात झाली आहे. यासाठी या सभा मंडपाच्या पूजनासाठी ही मंडळी उपस्थित होती.
यावेळी उचगाव ग्रामपंचायतचे सदस्य यादो कांबळे, मोनाप्पा पाटील, पुंडलिक मोरे, सुबाव अर्जुनवाडकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
प्रारंभी गणेशाचे पूजन करण्यात आले त्यानंतर बाळकृष्ण तेरसे आणि जयंवत बाळेकुंद्री यांच्या हस्ते सभा मंडपाच्या कॉलमचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना जयंत बाळेकुंद्री म्हणाले की, या भागातील हे जागृत गणेश देवस्थान असून हजारो भाविक भक्त या ठिकाणी श्री गणेशाचे दर्शन घेत असतात सर्व भाविकांचे मनोकामना पूर्ण करणारा हा सिद्धिविनायक असून या परिसरातील सर्व भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा आहे. यासाठी हे कार्यक्रम हाती घेतले आहेत तरी सर्वांनी त्यांना उदार असे सहकार्य करून हे काम पूर्णत्वास नेले आहे. कमिटीने केलेल्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बाळकृष्ण तेरसे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी गणेश मंदिर असून प्रतिवर्षी जन्मदर कमिटी या ठिकाणी अनेक उपक्रम राबवून या ठिकाणी हे कार्यक्रम करत असतात त्या मंदिराची देखभाल कमिटी योग्यपणे हाताळत असून नवसाला पावणाऱ्या गणपती आहे त्यामुळे सर्व भाविकांच्या उदार सहकार्यातून हे कार्य कधीच जात असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आणि सगळं असते आपली मदत करतात.
यावेळी कमिटीचे मधु बेळगावकर, अशोक चौगुले, पुंडलिक पावशे, भास्कर कदम, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. उपस्थितांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक चौगुले यांनी केले तर आभार पुंडलिक पावशे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *