बेळगाव : येळ्ळूर विभाग म ए समितीकडून मराठी सन्मान यात्रेचे प्रमुख नेते शुभम शेळके यांचे जल्लोषत स्वागत येळ्ळूर येथील शिवसेना चौक येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा व बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी येळ्ळूर विभाग म ए समिती नेते व येळ्ळूर ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर येळ्ळूर विभाग म ए समितीचे अध्यक्ष विलास घाडी यांनी येळ्ळूर विभाग म ए समितीकडून जाहीर पाठिंबा दर्शविला तसेच येळ्ळूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष भुजंग पाटील यांनी शुभम शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या व हिंदुहृदयसम्राट सन्मानीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शुभम शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं आणि 26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मराठा सन्मान यात्रेला येळ्ळूरमधून मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी माणसाची ताकत दाखवून द्या असे त्यांनी युवकांना उद्देशून आपली तळमळ व्यक्त केली. यावेळी मराठी माणसाची आन बाण शान भगवा ध्वज शुभम शेळके यांना सुपूर्द करून हा भगवा झेंडा आपण रायगडच्या भूमीत फडकू असा निश्चय केला.
यावेळी येळ्ळूर विभाग म ए समितीचे माजी अध्यक्ष शांताराम कुगजी, वाय सी इंगळे, परशराम घाडी, लक्ष्मण मेलगे, मनोहर पाटील, ग्रा प सदस्य परशराम परीट, रमेश मेनसे, पिंटू चौगुले, रामदास धुळजी, निखिल पाटील, शुभम जाधव, मधू य. पाटील, यल्लप्पा बिर्जे, मनोहर घाडी, प्रशांत भाटकांडे, युवराज घाडी, आनंद घाडी, सिद्धार्थ पाटील, बाळकृष्ण पाटील, सागर शहापुरकर, श्रीकांत नांदूरकर, नितीन कुगजी, रमेश कुगजी, महेश कुगजी, प्रभाकर मंगणाईक, विलास यरमालकर, गणेश कुगजी, स्वराभ जाधव, चेतन देवलतकर, स्वराभ कुगजी, मंथन खदरवाडकर, राहुल कुगजी, श्री मास्टमार्डी, बाळू धामनेकर, चांगप्पा धामनेकर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी येळ्ळूर विभाग म ए समितीचे सचिव राजू उघाडे यांनी आभार मानले..
Belgaum Varta Belgaum Varta