Tuesday , March 3 2026
Breaking News

येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात

Spread the love

 

येळ्ळूर : येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील होते. सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील व व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. तर नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे, संचालक प्रा. सी. एम. गोरल व रवींद्र गिंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, गेल्या 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 साली आम्ही नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना स्वातंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून केली. सोसायटीला आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे. संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार व हितचिंतक तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे व झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्थेने अल्पावधीतच गरुड झेप घेत, येळ्ळूर व परिसरात आपला नावलौकिक मिळवला आहे. वडगाव व येळ्ळूर येथे स्वतःच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर परमेश्वर नगर येळ्ळूर येथे नेताजी मराठी सांस्कृतिक भवनाची उभारणी करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनीही संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संचालक बि. डी. छत्र्यान्नावर, संजय मजुकर, सी.एम. उघाडे, परशराम गिंडे, शंकर मुरकुटे, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, डॉ. कुलदीप लाड, सेक्रेटरी दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, विजय धामणेकर, रवि कणबरकर, कांचन पाटील, ज्योती यरमाळकर, सोनाली सायनेकर, संगीता दणकारे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. तर आभार दीपक हट्टीकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *