Saturday , November 7 2026
Breaking News

अपत्य न झाल्याच्या कारणावरून पत्नीचा गळा आवळून खून; पती अटकेत

Spread the love

 

बैलहोंगल : अपत्य न झाल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ गावात घडली.

फकीरप्पा गिलक्कनवर (रा. नेगिनहाळ) असे आरोपी पतीचे नाव असून, त्याने पत्नी राजेश्वरी (वय २१) हिचा उसिरगाठून खून केल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली आहे. पत्नीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची खोटी कथा रचत आरोपीने नातेवाईकांना घटनेची माहिती दिली होती.

मात्र अंत्यसंस्काराच्या वेळी राजेश्वरीच्या गळ्यावरील जखमेच्या खुणा पाहून तिच्या पालकांना संशय आला. त्यांनी तत्काळ बैलहोंगल पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात राजेश्वरीचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी फकीरप्पाला अटक केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *