देसूर : येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले उचगांव ब्लॉक युवा काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकट पाटील यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले.
या मंगल प्रसंगी पाटील कुटुंबियांच्या वतीने पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी ‘श्री स्वामी समर्थ’ नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिक आणि स्वामी समर्थ भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
पादुका आगमनानंतर आयोजित करण्यात आलेल्या आरती आणि प्रसादाचा लाभ अनेक मान्यवरांनी व भक्तांनी घेतला. व्यंकट पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “स्वामींच्या पादुकांचे घरी आगमन होणे हे आमच्या कुटुंबासाठी अत्यंत भाग्याचे आणि समाधानाचे आहे. स्वामींच्या आशीर्वादाने सर्वांचे कल्याण व्हावे, हीच चरणी प्रार्थना.”
Belgaum Varta Belgaum Varta