Tuesday , March 3 2026
Breaking News

‘कवितेचे पान’ चॅनलवरील हर्षदा सुंठणकर यांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

Spread the love

 

बेळगाव : ‘आई कुठे काय करते’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्या ‘कवितेचे पान’ या यूट्यूब चॅनलवर नुकतीच हर्षदा सुंठणकर यांची मुलाखत व कविता वाचनाचा विशेष एपिसोड प्रसारित झाला असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

हर्षदा सुंठणकर यांच्या गाजलेल्या ‘कपडे वाळत घालणारी बाई’ या कवितासंग्रहाचा हिंदी अनुवाद अकोल्याच्या डॉ. स्वाती दामोदरे यांनी केला आहे. सदर अनुवाद ‘कपडे सुखाती औरत’ या नावाने गेल्या 13 जानेवारी रोजी दिल्ली येथे न्यू वर्ल्ड पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाला आहे.
याखेरीज गेल्या 9 ते 11 जानेवारी दरम्यान पणजी येथे झालेल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात हर्षदा सुंठणकर यांना निमंत्रित कवयित्री म्हणून विशेष आमंत्रण देण्यात आले होते. या संमेलनात त्यांनी सादर केलेल्या कवितेला उपस्थित रसिकांकडून भरभरून दाद मिळाली होती.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *