
बेळगाव : बेळगावातील प्रोत्साह फाऊंडेशनच्या वतीने रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता महांतेश नगर येथील महंत भवनात समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन स्नेहल रायमाने (आय. ए. एस.) करणार आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कलबुर्गी ग्रामीणचे आमदार बसवराज मत्तीगुड उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर या मेळाव्याला कर्नाटक राज्य समगार हयळय्या समाजाचे अध्यक्ष जगदीश बेटगिरी, हरळय्या समाज प्रमुख शिवानंद मब्रुमकर, बेळगावचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमन्नी, चंद्रकांत लोकरे, सुरेश सांगली, डॉक्टर चंद्रकांत वाघमारे, मल्लिकार्जुन ताळीकोटी, बेळगाव चर्मकार समाज महामंडळ अध्यक्ष रवी शिंदे, उद्योजक हिरालाल चव्हाण, सागर कित्तूर, सागर कोळेकर, शंकर कांबळे, रवी होनगल आदी मान्यवर मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रोत्साह फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष होनगल यांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta