Monday , December 8 2025
Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळची पूर्वतयारीची सभा

Spread the love


बेळगाव: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पूर्वतयारीची सभा घेण्यात आली या सभेला दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बेळगावात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत आंबेडकर उद्यानात झालेल्या सभेत चर्चा करण्यात आली. 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता अशोक सर्कल येथून कसाई गल्ली, मार्केट पोलीस स्टेशन, चव्हाट गल्ली ते चन्नम्मा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उध्यानपर्यंत भीम ज्योतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने भीम ज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. तेथून काळी अंबराई, कंग्राळ गल्ली येथून ते धर्मवीर संभाजी चौक येथे या भीम ज्योतीचे सांगता करून नंतर चित्ररथांची मिरवणूक काढण्यात येणार आहे असे ठरविण्यात आले.
यावेळी बोलताना दलित नेते मल्लेश चौगुले म्हणाले, गेली २-३ वर्षे कोरोनामुळे आंबेडकर जयंती भव्य प्रमाणात साजरी करता आली नव्हती. पण यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने भव्य प्रमाणात जयंती साजरी करण्याचा निर्णय सरकारने, जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने यात भाग घेऊन जयंती यशस्वी करावी असे आवाहन केले.
दलित नेते एम. आर. कलपत्री म्हणाले, यल्लप्पा कोलकर यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर जयंती उत्सव समिती नेमली आहे. आंबेडकर जयंती उत्सवाला जिल्हा प्रशासन सर्व प्रकारचं सहकार्य करणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी यात उत्साहाने सहभाग घ्यावा असे आवाहन कलपत्री यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामंडळ नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उत्सव महामंडळ अध्यक्षपदी यल्लप्पा कोलकार, उपाध्यक्ष म्हणून सुधीर चौगुले व सिद्राय मेत्री, सेक्रेटरी म्हणून कृष्णा कांबळे, उपसेक्रेटरी म्हणून रवी बस्तवाडकर, खजिनदार म्हणून संतोष हालगेकर जनसंपर्क सदस्य म्हणून दुर्गेश मेत्री, संतोष कांबळे, महादेव हादीमनी, शंकर कांबळे, बाबू पुजारी, यांची निवड करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *