Tuesday , March 3 2026
Breaking News

संजीवीनी फाउंडेशनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : संजीवीनी फाउंडेशनच्या आदर्श नगर येथील काळजी केंद्रात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ओरिओनिस प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे सीईओ टी. आर. पालकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणत देशप्रेमाची भावना व्यक्त केली. कार्यक्रमास संजीवीनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे तसेच संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
चेअरमन मदन बामणे यांनी टी. आर. पालकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे टी. आर. पालकर यांनी, भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे आपल्या दैनंदिन जीवनात पालन करणे हीच प्रजासत्ताक दिनाची खरी भावना आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या संस्थांचे योगदान राष्ट्रउभारणीत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केले.
यानंतर चेअरमन मदन बामणे यांनी आपल्या भाषणात, संजीवीनी फाउंडेशनच्या माध्यमातून मानवसेवा, आरोग्यसेवा आणि काळजी केंद्रातील रुग्णांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे हेच खरे देशभक्तीचे रूप आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी काळजी केंद्रातील रुग्णांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास डॉ. सुरेखा पोटे, विद्या सरनोबत, पद्मा औषेकर, पुष्पा बेंडवाड, सुनील चन्नदासर, अर्चना शिरहट्टी, सावित्री माळी, अक्षता अक्कोळे, संजीवनी पोतदार, कावेरी लमानी, गुरुराज हडपद, कावेरी नेगी, विजयालक्ष्मी पाटील तसेच काळजी केंद्रातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बसम्मा बेनकट्टी यांनी सूत्रसंचालन केले तर सरिता सिद्दी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *